संपादक-२०२३ - लेख सूची

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या जुलै २०२३ च्या कृत्रिमप्रज्ञा विशेषांकाला लेखकांचा आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या अंकाच्या मनोगतात आम्ही लिहिले होते की,  आजवरच्या विकासात बनलेली साधने, उपकरणे, तंत्रज्ञान हे माणसाचे शारीरिक श्रम कमी करून त्याची ऊर्जा आणि त्याचा वेळ वाचवण्यासाठी बनलेली दिसतात. असा मोकळा वेळ मिळाला तर बुद्धी सृजनाचे काम अधिक करते. आज कृत्रिमप्रज्ञेसारख्या शोधाने मात्र माणसाच्या …

मनोगत

सादर निरोप नंदा खरेंनंतर एका वर्षाच्या आत ‘आजचा सुधारक’ने आणखी दोन खंदे विचारवंत गमावले. सुनीती देव लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता, विवेकी विचारवंत, आणि ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात अनेक वर्षे कार्यरत सुनीती देव ह्यांचे २ मे २०२३ ला निधन झाले. अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात त्या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका होत्या. परंतु नागपुरात त्यांची ओळख फार वेगळी होती. सुनीतीताई …

मनोगत

‘आजचा सुधारक’ विवेकवादी चिंतनाला वाहिलेले आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विवेकाधीष्ठित विचारांना यात प्राधान्य असणे साहजिकच आहे. १८ डिसेंबरला ब्राइट्स सोसायटीने पुणे येथे ‘राष्ट्रीय नास्तिक परिषद’ आयोजित केली होती. परिषदेच्या पहिल्या भागात नास्तिकता, विवेकवाद, विज्ञाननिष्ठा आणि या सगळ्याला मिळणारे आणि मिळायला हवे असणारे कायद्याचे संरक्षण यावर आमंत्रितांची भाषणे झाली. तर दुसऱ्या भागात काही चर्चासत्रे …

मनोगत

हरिहर कुंभोजकर ह्यांचा ‘हिरण्यकश्यपूचे मिथक……’ हा लेख आणि निखिल जोशी ह्यांना त्या लेखात सापडलेल्या विसंगती हे दोन्ही ‘आजचा सुधारक’च्या जानेवारीच्या अंकात प्रकाशित झाले होते. “हे एकाच वेळी प्रकाशित झाले ह्याचा अर्थ निखिल जोशी ह्यांना मूळ लेख प्रसिद्धीपूर्वीच उपलब्ध झाला होता” अशी तक्रारवजा मांडणी हरिहर कुंभोजकर ह्यांनी त्यांच्या प्रतिवादात केली आहे. ही त्यांची तक्रार रास्तच आहे. …

मनोगत

जगण्याच्या रोजच्या धडपडीतून, मनात चाललेल्या वैचारिक गोंधळाकडे थोडे दुर्लक्ष होत असते. परंतु सभोवतालच्या घटनांमुळ आपण अस्वस्थ होत असतो. ही अस्वस्थता दूर करण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे संवाद. हा संवाद परस्परांमध्ये थेट घडत असतो किंवा पुस्तके, नाटके, चित्रपट, वा समाजमाध्यमे अशा अनेक मार्गांनी तो घडत असतो. १८ डिसेंबर २०२२ ला पुणे येथे झालेली नास्तिक परिषद ही संवादाची अशीच एक जागा होती. …